
बॉलिवूड अभिनेता गोविंदा मोठ्या पडद्यापासून दूर आहे. गेल्या काही काळापासून त्याने बॉक्स ऑफिसवर एकही हिट चित्रपट दिलेला नाही. आता त्याची पत्नी सुनीता आहुजा हिने पुन्हा अभिनेत्याच्या कारकिर्दीवर भाष्य केलंय. तिने 'हिरो नंबर १' असणाऱ्या गोविंदाच्यामित्रांवर तीव्र आणि स्पष्ट टीका केली आहे आणि त्यांच्यावर त्याच्या कारकिर्दीला हानी पोहोचवण्याचा आरोप केला आहे. तिने म्हटलंय की गोविंदा ज्या लोकांमध्ये राहतो ते चुकीचं आहे. त्यावरून त्यांची भांडणं होतात आणि ती गोविंदाचं खोटं कौतुक करू शकत नाही.