
अभिनेत्री सनी लिओनी हिने आपल्या मोजक्या चित्रपटातून आणि गाण्यांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तिने डॅनियल वेबर याच्याशी २०११ माडेच लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये महाराष्ट्रातील लातूर येथून निशा कौर वेबर हिला दत्तक घेतलं. त्यावेळेस निशा २१ महिन्यांची होती. त्यानंतर त्यांना सरोगसीने जुळी मुलं झाली. आशेर सिंग वेबर आणि नोआ सिंग वेबर अशी या मुलांची नावे आहेत. आता एक पॉडकास्टमध्ये सनीने सरोगसीसाठी किती पैसे दिले याबद्दल सांगितलं आहे.