‘नाचा दणाना’वर थिरकणार महाराष्ट्र! ‘सुपर डुपर’मधील जल्लोषमय गाणे प्रदर्शित

Super Duper Movie New Song Out : सुपर डुपर सिनेमातील नवीन गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलं. जाणून घेऊया या सिनेमाविषयी आणि गाण्याविषयी.
Super Duper Movie New Song Out

Super Duper Movie New Song Out

esakal

Updated on

Marathi Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या जोरदार चर्चेत असलेल्या ‘सुपर डुपर’ या आगामी चित्रपटातील ‘नाचा दणाना’ हे गाणे प्रदर्शित होताच चांगलेच व्हायरल होत आहे. हळदीचे हे गाणे धमाल संगीत, भव्य सजावट आणि उत्साहाने भरलेल्या सादरीकरणामुळे पाहाताक्षणीच थिरकायला भाग पडणारे आहे. यात ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले यांची जोडी विशेष उठून दिसत आहे तर त्यांच्या जोडीला ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके आणि प्रतीक्षा कोते या जबरदस्त कलाकारांचा जल्लोष अधिकच रंगत आणत आहे. समीर आशा पाटील, यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला अभिनव जगताप यांचे उत्स्फूर्त संगीत लाभले आहे. तर आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने या गाण्यात अफलातून एनर्जी आणली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com