
Marathi Entertainment News : मराठी मनोरंजनविश्वातील एक सुंदर अभिनेत्री आणि एकेकाळच्या सुपरस्टार म्हणजे अभिनेत्री रंजना देशमुख (Ranjana Deshmukh). व्ही. शांताराम (V Shantaram) यांची भाची असलेल्या रंजना यांनी अल्पावधीतीच मराठी इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण केली होती. रंजना या दिवंगत अभिनेत्री वत्सला देशमुख (Vatsala Deshmukh) यांच्या कन्या. त्यांची आईसुद्धा एक प्रसिद्ध मराठी आणि बॉलिवूड अभिनेत्री होत्या.