
रजनीकांतचा ‘कुली’ चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी लीक झाला आहे.
अशा थर्ड पार्टी डाउनलोडमुळे चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होऊ शकतो
काही वेबसाईट आणि टेलिग्राम ग्रुप्स आहेत जे या चित्रपटाची लिंक उपलब्ध करून देत आहेत
Rajinikanth Coolie Movie Online Download Link Viral : सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुचर्चित चित्रपट ‘कुली’ प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी पायरसीच्या कचाट्यात सापडला आहे. 14 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट दुपारपर्यंतच तमिलरॉकर्स, फिल्मीझिला, मूव्हीरुल्स आणि मूव्हीजदा यांसारख्या पायरसी वेबसाइट्सवर उपलब्ध झाला. 1080p एचडीपासून 240p कमी दर्जाच्या प्रतींपर्यंत सर्व आवृत्त्या अवैधरित्या व्हायरल झाल्या.