suraj chavan
esakal
Premier
२ कोटींच्या गाडीतून वरात घेऊन निघाला सुरज चव्हाण; नवरदेवापेक्षा सोबत असणाऱ्या व्यक्तीने वेधलं लक्ष, ती व्यक्ती कोण?
suraj chavan wedding:'बिग बॉस मराठी ५' चा विजेता ठरलेला सुरज चव्हाण आज बोहोल्यावर चढणार आहे. तो तब्बल २ कोटींच्या गाडीतून वरात घेऊन निघालाय.
'बिग बॉस मराठी ५' जिंकून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय रीलस्टार सुरज चव्हाण आज २९ नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. सुरजच्या लग्नाला अगदी काही तास उरले आहेत. २८ नोव्हेंबर रोजी त्याने त्याच्या घाणा आणि बांगड्यांच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्याच्या हातावर मेहेंदी देखील काढण्यात आली. आता अखेर नवरामुलगा नटला आहे. लग्नासाठी तो घरून निघाला होता. त्याची वरात आता थेट लग्नाच्या हॉल पर्यंत पोहोचली आहे. एका लग्झरी कारमधून त्याची वरात निघालीये. अशातच त्याच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

