

आधी फोन मग छोटा पडदा आणि मग मोठा पडदा असा प्रवास करणारा लोकप्रिय रीलस्टार सुरज चव्हाण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचा 'झापूक झूपुक' चित्रपट काळ २५ एप्रिल रोजी प्रदर्शित झालाय. सुरजने 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनची ट्रॉफी आपल्या नावावर केली. त्याने 'बिग बॉस मराठी' जिंकताच संपूर्ण महाराष्ट्राने त्याला डोक्यावर घेतलं. त्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याला घेऊन 'झापूक झूपुक' हा चित्रपट बनवला. आता या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केलीये पाहूया.