पाया बांधला, भिंती... पाहा किती झालंय सुरज चव्हाणच्या नव्या घराचं काम; स्वतः मजुरासारखा राबतोय अभिनेता

Suraj Chavan New House Update : लोकप्रिय अभिनेता सुरज चव्हाण याच्या घराचं काम जोरात सुरू आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर करत याबद्दल सांगितलं आहे.
suraj chavan
suraj chavanesakal
Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी' मधून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय रीलस्टार सुरज चव्हाण अनेकांच्या दिलाची धडकन बनला आहे. 'बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा विजेता झाल्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत आणखीनच वाढ झाली. तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असतो. तो त्याच्या व्हिडिओंमध्ये चाहत्यांसोबत जोडलेला राहतो. आता त्याने नुकताच एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात त्याच्या घराचं काम कसं सुरू आहे हे दिसतय. सोबतच या घरासाठी तोदेखील काम करताना दिसतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com