
Marathi Entertainment News : बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता सूरज चव्हाण कमी कालावधीत प्रसिद्ध झाला. बिग बॉस मराठीमुळे सुरजच्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी बाजू प्रेक्षकांना अनुभवता आली. सूरज आता नव्या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. झापुक झुपक असं त्याच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला.