

SURAJ CHAVAN IN BIGG BOSS MARATHI 6 HOUSE
ESAKAL
'बिग बॉस मराठी' हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक गाजलेल्या कार्यक्रमांपैकी एक आहे. या कार्यक्रमात अनेक वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एकाच घरात येऊन राहतात, एकमेकांसोबत खेळ खेळतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारी ही मंडळी या घरातून वेगळी ओळख घेऊन जातात. हे घर अनेकांना नवी ओळख मिळवून देतं. या शोमुळे अनेकांची आयुष्य बदललीयेत. या घरातला असाच एक स्पर्धक म्हणजे सुरज चव्हाण. आता सूरजला 'बिग बॉस मराठी' च्या सहाव्या सिझनमध्ये येण्याचं आमंत्रण देण्यात आलंय. तो घरात जाणार की नाही याबद्दल त्यानेही स्पष्ट उत्तर दिलंय.