

SURAJ CHAVAN
ESAKAL
'बिग बॉस मराठी' सीझन ५ ची ट्रॉफी आपल्या नावावर करणारा लोकप्रिय रीलस्टार सुरज चव्हाण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकतंच सुरजचं घर बांधून तयार झालं. त्याने आपल्या नव्या घरात गृहप्रवेश करतानाचा एक व्हिडिओ शेअर केलाय. त्याचं आलिशान घर पाहून नेटकरी त्याचं कौतुक करताना दिसतायत. आता सुरज लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे चाहते त्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र त्यापूर्वी सूरजच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुरजने होणाऱ्या पत्नीसोबत प्री- वेडिंग शूट केलंय.