
Marathi Entertainment News : ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा जुहू तारा रोड येथे असलेला आजिवसन गुरुकुल संकुलाचा भूखंड वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर भूखंडावर वाटप शर्तींचा भंग झाल्याचा ठपका चौकशीअंती ठेवला आहे. आंतरराष्ट्रीय शाळेसाठी विनापरवानगी भाड्यावर जागा देणे, विनापरवानगी निवासी वापर अशी निरीक्षणे या चौकशी दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाने नोंदवली असून यावर पुढील कारवाई करण्याची विनंती राज्य सरकारला केली आहे.