जर तिचं लग्न माझ्यासोबत झालं असतं तर... माधुरीसोबत लग्न तोडण्यावर सुरेश वाडकरांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

SURESH WADKAR ON MADHURI DIXIT REJECTED MARRIAGE PROPOSAL: लोकप्रिय मराठी गायक सुरेश वाडकर यांनी माधुरी दीक्षितला लग्नासाठी नकार दिला होता, असं सांगण्यात येतं. आता याबद्दल त्यांनी पहिल्यांदाच भाष्य केलंय.
SURESH WADKAR ON MADHURI DIXIT

SURESH WADKAR ON MADHURI DIXIT

ESAKAL

Updated on

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला वेगळ्या ओळखीची गरज नाही. तिने आपल्या अदांनी प्रेक्षकांना भुरळ घातली, तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा आहेत. तिच्या अभिनयाच्या जोरावर ती बॉलिवूडमधली सर्वाधिक गाजलेली अभिनेत्री ठरलीये. मात्र जितकी तिच्या चित्रपटांची चर्चा होते. तितकीच तिच्या वैयक्तिक आयुष्याची देखील चर्चा रंगते. इंडस्ट्रीमध्ये काम करताना माधुरीचं नाव अनेक कलाकारांसोबत जोडलं गेलं. माधुरी आणि संजय दत्त यांच्यातील नातं असेल किंवा एका राजघराण्याची सून होण्याची तिने गमावलेली संधी असेल. माधुरी कायमच चर्चेचा विषय ठरली. आणखी एक व्यक्ती होता ज्यांच्यासोबत माधुरीच्या लग्नाच्या चर्चा रंगलेल्या. हा व्यक्ती म्हणजे लोकप्रिय मराठी गायक सुरेश वाडकर.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com