मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा… दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’; राबवली ‘बीज गुढी’ची अनोखी संकल्पना

Chirayu Gudhi Padwa Celebration 2026 : शेलार मामा फाऊंडेशन आयोजित चिरायू 2026 सोहळा नुकताच थाटात पार पडला. या सोहळ्यात बीज गुढीची अनोखी संकल्पना राबवण्यात आली.
मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा… दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’; राबवली ‘बीज गुढी’ची अनोखी संकल्पना
Updated on

Marathi Entertainment News : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत. येत्या गुढीपाडव्याचं औचित्य साधत ‘शेलार मामा फाउंडेशन’ आयोजित ‘चिरायू २०२६’ हा कलाकारांच्या सन्मानाचा आणि नात्यांच्या उत्सवाचा सोहळा मोठ्या दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला. अवघं मराठी कलाविश्व यानिमित्ताने एकवटलं होतं. नवनवे संकल्प आणि कार्य-प्रकल्पांसोबत मनोरंजनाची गुढी उभारत मराठी नववर्षाचं स्वागत ‘चिरायू’तर्फे दणक्यात साजरं केलं जातं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com