
लोकप्रिय अभिनेत्री सुष्मिता सेन हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. तिची 'ताली' ही सीरिज प्रचंड गाजली. मात्र गेल्या वर्षी सुष्मिता एका कठीण काळाला सामोरी गेली होती. २०२३ मध्ये अभिनेत्रीला हार्ट अटॅक आला होता. त्यातून ती बचावली होती. तिच्या आर्टरीमध्ये ९५ टक्के ब्लॉकेज होतं. त्यानंतर तिच्यावर अँजियोप्लास्टी झाली आणि तिला स्टेंट्ससुद्धा टाकण्यात आले होते. तेव्हा सुष्मिता कुणालाही डेट करत नव्हती. तिचं आणि रोहमन शॉल यांचं ब्रेकअप झालं होतं. मात्र आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रोहमनने त्यावेळेस त्याची अवस्था कशी झालेली याबद्दल सांगितलं आहे.