
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मिस युनिव्हर्स अभिनेत्री सुष्मिता सेन कायमच आपल्या चाहत्यांसोबत जोडलेली असते. तिच्या प्रत्येक पात्रामध्ये एक वेगळेपणा असतो. तिची 'ताली' ही सीरिज प्रचंड गाजली. तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. मात्र तिचा इथवरचा प्रवास मुळीच सोपा नव्हता. तिने पावलापावलावर स्वतःला सिद्ध केलंय. अशाच एका मुलाखतीत तिने तिच्या मुलीबद्दल सांगितलं होतं, जेव्हा तिने शाळेतल्या मुलाच्या कानात पेन्सिल टाकली होती. तेव्हा सुष्मिताने ती परिस्थिती कशी हाताळली होती हे तिने सांगितलं.