

प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभ मेळा भारतासह जगभरातील लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरतोय आणि जगभरातील भक्तांनी या महा कुंभ मेळ्यात खास हजेरी देखील लावली आहे. हिंदू धर्मात पवित्र मनाला जाणाऱ्या महाकुंभ मेळ्यात निर्माता अभिनेता स्वप्नील जोशीने जाऊन पवित्र स्नान करून आशीर्वाद घेतले आहेत. स्वप्नील हा कायम वेगेवगळ्या देव स्थांनाना भेट देताना दिसतो. आता तो थेट महाकुंभ मेळ्यात पोहोचलाय.