

'मितवा' बनून सगळयांच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी याने चाहत्यांना गुड न्यूज दिलीये. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. नवनवीन भूमिकांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. लवकरच तो दोन नव्या चित्रपटात दिसणार आहे. मात्र त्यापूर्वी त्याने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. स्वप्नीलने सगळ्यात महागड्या गाड्यांपैकी एक गाडी खरेदी केली आहे. त्याने आपल्या आई- वडिलांसाठी ही गाडी घेतली आहे.