

swapnil joshi
ESAKAL
'मितवा', 'दुनियादारी', 'समांतर' अशा अनेक चित्रपट आणि वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी याने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहीट ठरले. अगदी बालपणापासून अभिनयाची कारकीर्द सुरू केलेला स्वप्नील आज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. तो मराठी सिनेसृष्टीतील सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहे. मात्र वैयक्तिक आयुष्यात त्याने एक मोठा वाईट काळ सहन केलाय. स्वप्नीलचा घटस्फोट झाला होता. एका मुलाखतीत पहिल्यांदाच तो याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसला.