प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा हा सुपरहिरो असतो आणि त्या बाबासाठी लेक ही सगळंकाही असते. अभिनेता निर्माता स्वप्नील जोशीला सुद्धा आपल्या लेकीचं भारी कौतूक आहे. त्याने सोशल मीडियावर लेकीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. फक्त स्वप्नीलच नाही तर संपूर्ण सिनेसृष्टीने स्वप्नीलच्या लेकीचं मायराचं कौतुक केलंय. याच कारण म्हणजे स्वप्नीलच्या लेकीचं सुद्धा आता कलाविश्वात पदार्पण केलय.