
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता स्वप्निल जोशी याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अगदी लहान असल्यापासून त्याने आपल्या अभिनयातील कारकिर्दीची सुरुवात केली. स्वप्निलचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. मराठी सिनेसृष्टीतील सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता असणारा स्वप्निल तरुणींमध्ये चॉकलेट बॉय म्हणून लोकप्रिय आहे. मात्र त्याचा घटस्फोट झाला होता हे अनेकांना ठाऊक नाहीये. लग्नाच्या ४ वर्षानंतर स्वप्निल वेगळा झाला. आता पहिल्यांदाच तो त्याच्या पहिल्या लग्नाबद्दल बोलला आहे.