
पती-पत्नीच्या नात्यामध्ये कधी कधी संशयाचे वादळ घोंघावत असते. त्यांच्या नात्यामधील जिव्हाळा तसेच प्रेमाचा गोडवा कमी झालेला असतो. अशा वेळी एकमेकांशी संवाद साधणे अपेक्षित असते. अशा संभाषणामुळे संशयाचे ढग आपोआप दूर लोटले जातात आणि त्यांच्या नात्यामध्ये प्रेमाचा फुलोरा अधिक फुलतो. त्यांच्या नात्यातील हरवलेला गोडवा अधिक गोड होतो. ‘सुशीला सुजीत’ हा चित्रपट याच गोष्टींवर भाष्य करणारा आहे.