"ही काय खाते?"; बॉडी शेमिंग करणाऱ्या फूड ब्लॉगरला स्वराचं सणसणीत उत्तर म्हणाली, ”बाळाला स्तनपान करणाऱ्या...”
Swara Bhaskersakal

Swara Bhasker: "ही काय खाते?"; बॉडी शेमिंग करणाऱ्या फूड ब्लॉगरला स्वराचं सणसणीत उत्तर म्हणाली, ”बाळाला स्तनपान करणाऱ्या...”

Bollywood News: फूड ब्लॉगरला स्वरानं आता सडेतोड उत्तर दिलं आहे. स्वरानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Published on

Swara Bhasker: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही सध्या चर्चेत आहे. एका फूड ब्लॉगरनं स्वराला बॉडी शेमिंग केलं. या फूड ब्लॉगरला स्वरानं आता सडेतोड उत्तर दिलं आहे. स्वरानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

फूड ब्लॉगरनं स्वराला केलं बॉडी शेम

फूड ब्लॉगर नलिनी आणि स्वरा यांच्यात वाद सुरू झाला जेव्हा स्वरा भास्करने नलिनीनं शाकाहारी जेवणाबाबत केलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली. स्वराला प्रत्युत्तर देताना नलिनीने तिला बॉडी शेमिंग केलं. नलिनीनं स्वराचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिलं,"ही काय खाते?" यावर स्वरानं आता रिप्लाय दिला, "फोटोमधील महिलेला बाळ झालं आहे, काही तरी चांगलं कर नलिनी!"

त्यानंतर नलिनीनं ट्वीटमध्ये लिहिलं, "मी चांगले काम करत होते, पण तू माझ्या शाकाहारी जेवणाबद्दल केलेल्या पोस्टवर द्वेष पसरवून माझ्या वाट्याला आली. मी नियमितपणे शाकाहाराचा प्रचार करते आणि ती पोस्ट त्याचाच एक भाग होती. तुझ्या रिप्लायनं तो जातीय मुद्द्या झाला, म्हणूनच मी त्या दिवशी प्रतिसाद दिला नाही."

"ही काय खाते?"; बॉडी शेमिंग करणाऱ्या फूड ब्लॉगरला स्वराचं सणसणीत उत्तर म्हणाली, ”बाळाला स्तनपान करणाऱ्या...”
Swara Bhasker: धर्म वेगळा अन् वयात अंतर.. तरी फहाद अहमदच्या प्रेमात कशी पडली स्वरा भास्कर? स्वत:च सांगितली लव्ह स्टोरी

“तुमच्या खाण्याच्या निवडी तुमच्या स्वतःच्या आहेत आणि मला त्यात काही हरकत नाही. पण,मी माझी मतं व्यक्त करु शकते आणि मी शाकाहाराचा प्रचार देखील करुन शकते. होय, मी शाकाहारी आहे आणि मला समजते की दुग्धव्यवसाय काही प्रकारे क्रूर असू शकतो. मी विगन झाल्यावर मला अधिक अभिमान वाटेल. तू माझ्या पोस्टला जातीय मुद्दा बनवले आहे. तुझा चाहता वर्ग मोठा आहे, त्यामुळे कृपया अशा टिप्पण्या करण्यापूर्वी दोनदा विचार कर. तुझ्या शब्दांचा समाजावर परिणाम होऊ शकतो आणि माझ्यासारख्या लोकांना मोठा त्रास होऊ शकतो.”, असंही नलिनीनं पोस्टमध्ये लिहिलं.

स्वरानं नलिनीच्या पोस्टला कमेंट केली, "बकर-ईदच्या दिवशी मुस्लिमांना टार्गेट करण्याच्या हेतूने मी तू केलेल्या शाकाहाराबाबतच्या पोस्टवर कमेंट केल्यामुळे तू नाराज झाली आहेस. ठीक आहे, पण माझ्यासोबत शाकाहाराविषयी बोलण्याऐवजी तू बाळाला स्तनपान करणाऱ्या आईच्या वाढवल्या वजनाबद्दल बोललीस? तू खरंच nutritionist आहेस का?"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com