
Entertainment News : सोशल मीडियावरील स्टँडअप कॉमेडीचे व्हिडीओ कायमच चर्चेत असतात. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक स्टँडअप कॉमेडीयन्सचं करिअर स्थिरावलं आहे. स्टँडअप कॉमेडियनची वाढती लोकप्रियता आणि मागणी यामुळे अनेक नवीन कलाकारही या क्षेत्रात येत आहेत. पण बऱ्याचदा त्यांनी केलेले विनोद वादग्रस्त ठरतात आणि त्याचे वाईट परिणाम त्यांना भोगावे लागतात. रणवीर अलाहबादीया आणि समर रैना यांच्या अश्लील विनोदाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणखी एक महिला स्टँडअप कॉमेडियन अडचणीत आली आहे.