
Entertainment News : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेची निर्मिती करणाऱ्या नीला फिल्म प्रॉडक्शन्सने सामाजिक बांधिलकीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. निर्माते असित कुमार मोदी यांच्या पुढाकाराने गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत कार्यरत असणाऱ्या शेकडो कामगार व तंत्रज्ञांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक रुग्णवाहिका भेट देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात ही रुग्णवाहिका फाळके चित्रनगरी प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली.