Gurucharan Singh: "त्याची तब्येत ठीक नव्हती, तो जास्त खात पण नव्हता"; बेपत्ता झालेल्या गुरुचरण सिंगच्या जवळच्या मैत्रिणीनं दिली माहिती

Gurucharan Singh: गुरुचणच्या एका जवळच्या मैत्रिणीनं त्याच्या हेल्थबाबत सांगितलं आहे.
Gurucharan Singh: "त्याची तब्येत ठीक नव्हती, तो जास्त खात पण नव्हता"; बेपत्ता झालेल्या गुरुचरण सिंगच्या जवळच्या मैत्रिणीनं दिली माहिती

Gurucharan Singh: छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सध्या या कार्यक्रमातील रोशन सोढी ही भूमिका साकारलेला अभिनेता गुरुचरण सिंग (Gurucharan Singh) हा चर्चेत आहे. गुरुचरण हा बेपत्ता झाला आहे. त्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात जावून गुरुचरण बेपत्ता झाल्याची खबर दिली. अशातच आता गुरुचणच्या एका जवळच्या मैत्रिणीनं त्याच्या हेल्थबाबत सांगितलं आहे.

काय म्हणाली गुरुचणची मैत्रिण?

पिंकवीला या वेब साइटला माहिती देताना गुरुचरण सिंगची जवळची मैत्रिण मिस सोनी यांनी सांगितलं, "त्याचे पालक सध्या चिंतेत असून त्यांनी दिल्लीत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मी मुंबईतही तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो इथे परत न आल्याने येथे तक्रार करता येणार नाही. गुरुचरणजींची प्रकृतीही गेल्या अनेक दिवसांपासून ठीक नव्हती, त्यामुळे मी काळजीत आहे."

"दिल्लीला जाण्यापूर्वी त्यांचं ब्लड प्रेशर वाढलं होतं आणि त्याच्या काही टेस्ट देखील झाल्या होत्या. दिल्लीला जाण्यापूर्वी तो जास्त खात पण नव्हता. मी खरोखर आशा करते आणि प्रार्थना करते की तो बरा असेल आणि तो सुखरूप परत येईल.", असंही मिस सोनी यांनी सांगितलं.

Gurucharan Singh: "त्याची तब्येत ठीक नव्हती, तो जास्त खात पण नव्हता"; बेपत्ता झालेल्या गुरुचरण सिंगच्या जवळच्या मैत्रिणीनं दिली माहिती
Gurucharan Singh : 'तारक मेहता का उल्टा चश्मा'फेम अभिनेते गुरुचरण सिंह बेपत्ता; वडील म्हणाले...

गुरुचरणच्या वडिलांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती, त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं की, “माझा मुलगा गुरुचरण सिंग, वय- 50 वर्षे, 22 एप्रिल रोजी सकाळी 8:30 वाजता मुंबईला जाण्यासाठी निघाला होता. तो विमानतळावर गेला होता. पण तो मुंबईला पोहोचला नाही, तो घरी देखील परतला नाही आणि त्याचा फोनही लागत नाहीये."

तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमुळे गुरुचरणला विशेष लोकप्रियता मिळाली. पण त्यानं हा शो 2020 मध्ये सोडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com