

tanvi kolte
esakal
छोट्या पडद्यावर सध्या 'बिग बॉस मराठी ६' ची क्रेझ आहे. 'बिग बॉस' मध्ये अनेक नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आलेत. या १७ सदस्यांमध्ये आहे तन्वी कोलते. तन्वी यापूर्वी 'लक्ष्मी निवास' या मालिकेत होती. मात्र तिने मालिकेला रामराम करत 'बिग बॉस मराठी'च्या घरात जाण्याचा निर्णय घेतला. आता तन्वीची एक मुलाखत समोर आलीये ज्यात तिने तिच्या आयुष्यातील चढ उतारांबद्दल सांगितलं आहे. तिचे रिलेशन, ब्रेकअप पासून ते वडिलांच्या निधनापर्यंत सगळंच तिने मनमोकळेपणाने सांगितलं आहे. यात तिच्या नातेवाईकांनी त्यांच्या कुटुंबाला कसा त्रास दिला याबद्दलही ती बोलली आहे.