
गेल्या वर्षभरात प्रेक्षकांनी अनेक चांगले कलाकार गमावले. कुणी हार्ट अटॅकने तर कुणी गंभीर आजाराने मृत्यू पावलं. मात्र सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी यापूर्वी स्वतःहून स्वतःचं आयुष्य संपवलं. अशाच एका घटनेने आता सिनेसृष्टी हादरलीये. एका ३६ वर्षीय कलाकार ललित मनचंदा याने राहत्या घरी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलंय. त्याने मृत्यूपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहिली नसल्याने पोलीस या घटनेचा आणखी तपास करत आहेत. मात्र घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब त्याचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठवलाय.