पावसाच्या सरींमध्ये चिंब भिजणार तारिणी आणि केदार; तीन तास सुरू होतं शूट मालिकेचं शूट; म्हणते- मी पहिल्यांदाच...

TARINI SERIAL ROMANTIC SCENES: प्रपोजलनंतर केदार आणि तारिणीच्या नात्याने आता एका नव्या टप्प्यात प्रवेश केला आहे.
tarini serial

tarini serial

esakal

Updated on

आपल्या प्रेमाची कबुली देत केदारने तारिणीला मनापासून प्रपोज केल्यानंतर त्यांच्या नात्यातील गोडवा आणखी वाढला आहे. पहिली वटपौर्णिमा, एकमेकांसोबत घालवलेले सुंदर क्षण आणि आता त्यातच ऋतूतील पहिल्या पावसाची रोमँटिक सर... या सगळ्यामुळे त्यांच्या प्रेमाला आणखी बहर आला आहे. पावसाच्या सरींमध्ये एकमेकांसोबत भिजत, नकळत हसत-खेळत आणि मनमोकळ्या गप्पा मारत केदार-तारिणी प्रेमाचे अविस्मरणीय क्षण अनुभवताना दिसणार आहेत. त्यांच्या या गोड क्षणांमुळे प्रेक्षकांनाही त्यांच्या प्रेमाच्या सुंदर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com