

shivani sonar mother in law
ESAKAL
आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यास चाहते कायम उत्सुक असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना उत्सुकता असते. मराठी अभिनेत्री शिवानी सोनार हिने गेल्या काही वर्षात आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड लोकप्रियता मिळवली. ती वर्षभरापूर्वी 'तारिणी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेने शिवानीला घराघरात पोहोचवलं. तिने अभिनेता अंबर गणपुळे याच्याशी लग्न केलंय. मात्र तुम्ही शिवानीच्या सासूबाईंना पाहिलंत का? शिवानी पहिल्यांदाच आपल्या सासूबाईंसोबत छोट्या पडद्यावर दिसणार आहे.