Tath Kana: ‘ताठ कणा’मधून संघर्षाची उत्कंठावर्धक कथा
Stellar Cast and Creative Team: ‘ताठ कणा’ या प्रेरणादायी चित्रपटात उमेश कामत जगप्रसिद्ध न्युरोस्पाईन सर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी यांची भूमिका साकारत आहे. संघर्ष, चिकाटी आणि यशाची कहाणी सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांना स्पर्शून जाणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा, संवेदनशील आणि बहुगुणी अभिनेता उमेश कामत आता एका प्रेरणादायी आणि वास्तव घटनेवर आधारित भूमिकेत झळकणार आहे. तो जगप्रसिद्ध न्युरोस्पाईन सर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात दिसणार आहे.