
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सोडत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर ती कोणत्या मालिकेत दिसणार याबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. मात्र नुकतीच तेजश्रीने चाहत्यांना गुडन्यूज देत आपण नवीन मालिकेत दिसणार असल्याचं सांगितलं होतं. यात ती अभिनेता सुबोध भावे याच्यासोबत दिसणार होती. काही तासांपूर्वीच त्यांनी नव्या मालिकेची झलक प्रेक्षकांसोबत शेअर केली होती. आता या मालिकेचा प्रोमो आला आहे.