
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका आल्या. त्यात तेजश्री प्रधानची मालिका 'वीण दोघातली ही तुटेना' देखील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. यात सुबोध भावे हा तेजश्रीच्या विरुद्ध भूमिकेत दिसतोय. तेजश्रीने 'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडल्यानंतर प्रेक्षक नाराज झाले होते. त्यानंतर तिला पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक होते. मात्र प्रत्येक कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेच असं नाही. यावेळेस 'वीण दोघातली ही तुटेना' चा पहिला भाग काल ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. त्यानंतर प्रेक्षकांच्या या मालिकेवर काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेऊया.