
छोट्या पडद्यावर गेल्या महिन्याभरात काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यात झी मराठीवरील 'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका देखील आहे. यात अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसतेय. तेजश्रीने 'होणार सून मी या घरची' मधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. आता ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत ती स्वानंदीच्या भूमिकेत दिसतेय. मात्र जेव्हा तिला या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा तिने लगेच या मालिकेला होकार दिला नाही. तिने निर्मात्यांकडे एक दिवस मागितला. त्यामागचं कारण तिने मुलाखतीत सांगितलंय.