TEJASHREE PRADHAN
ESAKAL
Premier
मलाही संसार करायचाय! तेजश्री प्रधानचा व्हिडिओ व्हायरल... प्रोमोचे स्टेट्स चाहत्यांनी शेअर केले
VEEN DOGHANTLI TUTENA TEJASHREE PRADHAN NEW PROMO: अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. 'वीण दोघातली...' चा प्रोमो पाहून प्रेक्षक भारावलेत.
अभिनेत्री तेजश्री प्रधान ही प्रेक्षकांची आवडती आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातलीये. सध्या ती झी मराठीवरील 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेमध्ये दिसतेय. 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर तेजश्रीने या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. मालिकेचा टीआरपी कमी असला तरी मालिकेच्या नुकत्याच दाखवण्यात आलेल्या प्रोमोवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतायत. मालिकेतील तेजश्रीच्या अभिनयाचं प्रेक्षक कौतुक करतायत. तिचा अभिनय पाहून प्रेक्षकही भावुक झालेत.

