
छोट्या पडद्यावरील मालिकांचं गणित हे पूर्णपणे टीआरपीवर अवलंबून असतं. ज्या मालिकेचा टीआरपी जास्त ती मालिका जास्त काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करते. मात्र ज्या मालिकेचा टीआरपी कमी असतो ती मालिका लवकर बंद करण्यावर वाहिनीचा भर असतो. गेल्या महिन्याभरात दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यात झी मराठीवर तेजश्री प्रधानची 'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका होती. तर दुसरी शिवानी सोनार हिची 'तारिणी' ही मालिका आहे. या मालिका सुरू झाल्याने टीआरपी यादीत मोठा बदल पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्या आठवड्यात या मालिका आपलं स्थान पक्क करण्यात कमी पडल्यात असं दिसतंय.