
Marathi Entertainment News : मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री तेजश्री प्रधान अचानक मालिका सोडल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. प्रेमाची गोष्ट या स्टार प्रवाहवरील मालिकेत ती मुक्ताची भूमिका साकारत होती. अल्पावधीतच तिची ही भूमिका सुपरहिट ठरली पण तिच्या एक्झिटने सगळेचजण नाराज झाले.