अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केलाय. अशातच आता तेजश्रीची नवी मलिका 'वीण दोघातली ही सुटेना' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजश्रीचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक पुन्हा उत्सुक आहेत. अशातच आता तेजश्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ती पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय.