tejashree pradhan good news
esakal
Tejashri Pradhan’s New Film Announcement : अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. सध्या तेजश्री 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यातील तिचं स्वानंदीचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. समर आणि स्वानंदीमधील गोड वाद सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. झी मराठीवर तेजश्रीने आपलं एक वेगळं स्थान निर्माण करत टीआरपीमध्ये अव्वल स्थान पटकावलय.