

tejashree pradhan on trip
esakal
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलंय. तिच्या हसण्याने प्रेक्षकांना भुरळ घातलीये. गेली कित्येक वर्ष तेजश्री आपल्या अभिनयाच्या जोरावर छोट्या पडद्यावर राज्य करतेय. तिने 'होणार सून मी या घरची' मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. सध्या ती 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसतेय. या मालिकेत ती स्वानंदीच्या भूमिकेत दिसतेय. मात्र आता मालिकेच्या शुटिंगमधून ब्रेक घेऊन तेजश्री एका खास ठिकाणी पोहोचली आहे.