
छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. तेजश्रीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. तिने 'होणार सून मी या घरची'या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यानंतर ती 'अगंबाई सासूबाई' या मालिकेत दिसली. तेजश्रीचा श्रोतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्यामुळेच तिच्या 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. मात्र त्यासोबतच तेजश्रीच्या वैयक्तिक आयष्याचीदेखील चांगलीच चर्चा रंगलीये. लग्नानंतर शशांकसोबतचं तिचं वागणं बदलत गेलं असं त्याने सांगितलं होतं.