
मराठी मालिकाविश्वात अशा अनेक मालिका होऊन गेल्या कथानकाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अशाच मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'होणार सून मी या घरची' या मालिकेने प्रेक्षकांना एका वेगळ्याच जगात नेलं. सासूदेखील प्रेमळ असू शकते याचा प्रत्यय हा या मालिकेतून आला. घराघरातलं चित्र थोड्याफार प्रमाणात का होईना बदललं. पण या मालिकेने सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळवून दिली ती अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला. तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर ही नवी जोडी या मालिकेतून इंडस्ट्रीला मिळाली. आता एका कार्यक्रमात तेजश्रीने 'होणार सून मी या घरची' हे नाव ऐकताच अशी प्रतिक्रिया दिलीये.