
TEJASWINI LONARI
esakal
लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठे हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली होती. या हरहुन्नरी अभिनेत्रीने नुकताच या जगाचा निरोप घेतला. वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी प्रिया मराठेचं निधन झालं. मात्र निधनाच्या पूर्वीच प्रियाला जेव्हा तिच्या आजारपणाबद्दल कळालं तेव्हाच तिने तिचे सिनेसृष्टीतील संबंध तोडून टाकले. ती एकदम एकलकोंडी झाली. निधनाच्या काही महिन्यांआधीपासूनच तिने तिच्या मित्रमैत्रिणींना भेटणं बंद केलेलं. जेव्हा प्रियाला तिच्या आजाराबद्दल समजलं तेव्हा ती 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत काम करत होती. तिने एक्झिट घेतल्यानंतर अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हीने तिची जागा घेतली. आता तेजस्विनीने प्रियाबद्दल तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.