
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं आज १६ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झालं. त्या लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या आई होत्या. तर प्रेक्षकांसाठी त्या त्यांच्या लाडक्या पुर्णा आजी होत्या. त्यांच्या निधनाने आता प्रेक्षकांना देखील धक्का बसलाय. तर संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय. त्या ६८ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचं कारण समोर आलं आहे.