अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिचा मोठा चाहतावर्ग आहे. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने लाखोचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. परंतु सध्या तेजस्विनी राजकारणावर मत मांडताना दिसतेय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत सुद्धा बऱ्याच वेळा चर्चा करताना पहायला मिळते. तिने नुकतंच राज उद्धव यांच्या मेळाव्याला उपस्थिती लावली होती. यावेळी तिने राज ठाकरे मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती.