

tejaswini pandit on mother death anniversary
esakal
'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या लोकप्रिय ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं गेल्या वर्षी १६ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झालं. त्यांच्या अशा अचानक एक्झिटने सगळेच शॉक झाले. त्यांचं निधन हे मराठी कलाविश्वासाठी मोठा धक्का होता. त्यांनी अनेक नाटकांमध्ये मुख्य भूमिका साकारत आपल्या अभिनयाची ताकद दाखवली होती. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा मालिकांकडे वळवलेला. त्यांनी 'ठरलं तर मग' मालिकेतील पूर्णा आजीची भूमिका इतकी सुंदर साकारली की प्रेक्षक त्यांच्या प्रेमात पडले. मात्र त्यांच्या निधनाने चाहत्यांना स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. आता त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने एक पोस्ट करत त्यांची आठवण काढली आहे.