Tejashri Pradhan Award
esakal
अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या वीण दोघातली ही तुटेना या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील स्वानंदी प्रेक्षकांच्या मनातील एक भाग झाली आहे. तेजश्रीच्या अभिनयाचे देखील लाखो चाहते आहेत. दरम्यान तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अलिकडेच तेजश्रीचा 'महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार 2024' ने सन्मान करण्यात आला आहे. यासंदर्भात तिने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केली आहे.