कोल्हापूरच्या वाळवा तालुक्यातल्या सर्वसामान्य कुटुंबातील सचिन जाधव यांनी निर्माण केलेला 'तेंडल्या' हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट आहे. परंतु बिगबजेट चित्रपटांच्या गर्दीत तो अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे आता हा चित्रपट गावागावांत थेट रसिकांच्या दारात जाणार आहे.