

THARLA TAR MAG
ESAKAL
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मध्ये नवनवीन ट्विस्ट येत आहेत. टीआरपी यादीवर राज्य करणारी ही मालिका काहीशी रटाळ झाली होती. ज्यामुळे टीआर्पीदेखील कमी झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा मालिकेत नवीन ट्विस्ट आणला गेलाय. ज्यामुळे पुन्हा एकदा या मालिकेचा टीआरपी वाढण्याची शक्यता आहे. आता मालिकेत आलेल्या नवीन ट्विस्टनुसार कथानकात अस्मिताच्या नवऱ्याची एंट्री झालीये. मात्र त्याला पाहून सगळ्यांचं डोकं चक्रावलंय कारण सुभेदारांचा जावई हा अतिशय लबाड आणि स्त्रीलंपट माणूस आहे.