
छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. ही मालिका गेली २ वर्ष टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. मालिकेत सध्या वात्सल्य आश्रम केस सुरू आहे. मात्र त्यात मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी अर्जुनला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागलीये. आता मालिकेत मोठा ट्विस्ट आलाय. यापूर्वी समोर आलेल्या प्रोमोमुळे अर्जुन साक्षीला अडकवण्यात यशस्वी होणार हे तर निश्चित होतं. मात्र त्यासोबतच मालिकेत आणखी एक मोठा ट्विस्ट येणार आहे. मालिकेत साक्षीपाठोपाठ प्रियाला अटक होणार आहे.